ABP Majha Headlines : 9 AM : 4 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 9 AM : 4 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, अमरावतीतून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत नवनीत राणा अर्ज भरणार, राणा यांनी घेतलं अंबादेवीचं दर्शन 
नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आज सुप्रीम कोर्टाचा निकाल, सकाळा साडे अकराच्या सुमाराला निकाल येण्याची शक्यता
महायुतीतला धाराशिव मतदारसंघाचा तिढा सुटला, राणा जगजीतसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार, अजित पवार गटात आजच प्रवेश करण्याची शक्यता
यवतमाळमधून भावना गवळी यांना तिकीट नाकारल्याने समर्थक आक्रमक, सकाळी ११ वाजेपर्यंत निर्णय घेतला नाही तर वेगळी भूमिका घेण्याचा इशारा
हिंगोलीत महायुतीनं उमेदवार बदलला, हेमंत पाटलांऐवजी बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी, आज अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरमुळे उत्सुकता शिगेला, भाजपसोबत झालेल्या बैठकांबद्दल राज ठाकरे सांगणार का याकडे लक्ष
संजय निरूपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी, ठाकरे गटाबद्दल सातत्यानं जाहीर विधानं केल्यानं कारवाई, निरुपम यांच्या भूमिकेकडे लक्ष
अमरावती लोकसभेच्या लढतीतून आनंदराज आंबेडकरांची माघार, वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहीर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram