ABP Majha Headlines : 9 AM : 01 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 9 AM : 01 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
नवी दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ४ तास उमेदवारांच्या नावावर मंथन, आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
महाविकास आघाडीची जागावाटपावर चर्चा पूर्ण, पण फॉर्म्युला नाही, दोन दिवसांत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याचा नेत्यांना विश्वास
नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आज पाचवा दिवस, मुख्यमंत्री शिंदेंसोबत शिष्टमंडाळाची संध्याकाळी बैठक, तोडगा निघणार का याकडे लक्ष
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधकांच्या प्रश्नांना सरकारउत्तर देणार
मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धत, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, मात्र निवडणुका कधी होणार याबाबत संभ्रम कायम
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार, मुंबईतल्या चैन्यभूमीवर यात्रेचा समारोप
२ मार्चला बारामतीत नमो रोजगार मेळावा, मेळाव्याच्या कार्यक्रमपत्रिकेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंचं नाव मात्र शरद पवारांचं नाव वगळलं, मात्र पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार