ABP Majha Headlines : 8 PM : 24 October 2024 : एबीपी माझा 8 च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

बारामतीच्या मैदानात अखेर काका-पुतण्यांची लढाई, शरद पवार पक्षाकडून युगेंद्र पवारांचं नाव घोषित, पवारांच्या राष्ट्रवादीची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
अहेरीत अत्राम बापलेकीत रंगणार सामना...पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाग्यश्री अत्राम यांना उमेदवारी...कार्यकर्त्यांच्या विरोधानंतरही तुमसरमध्ये चरण वाघमारेंना तिकीट.
दिल्लीत तीन तास शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची अमित शाहांसोबत खलबतं. बंडखोरी टाळण्याची चाणक्यांची सूचना, जागावाटपाचा तिढा अद्याप कायम
जागावाटपात सेंच्युरी मारण्याचा ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा दावा, मविआतील तिन्ही पक्षांना ८५ पेक्षा जास्त जागा मिळणार, नाना पटोलेंची माहिती
महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे पक्षांत काही जागांवर अद्यापही घासाघीस.. वर्सोवा, भायखळा जागेसाठी वर्षा गायकवाड, अस्लम शेख मातोश्रीवर... विदर्भातल्या जागांसाठी सुनील केदारही मुंबईत..
छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळांकडून बंडाचं निशाण, नांदगावमधून सुहास कांदेंविरोधात अपक्ष म्हणून मैदानात, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram