ABP Majha Headlines : 8 PM : 2 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  8 PM : 2 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

उद्धव ठाकरे कोण आहे? त्याची लायकी आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याची? अशा शब्दात भाजपचे खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शरद पवारांचे वय 83 झाले तरी त्यांना स्वतःच्या जातीला न्याय देता आला नाही, ते आता लावालाव्या करत फिरत आहेत असंही ते म्हणाले. रविवारी महाविकास आघाडीने राज्य सरकारविरोधाच जोडे मारो आंदोलन केलं. त्याला नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिलं. 

नारायण राणे म्हमाले की, शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला तो माझ्या मतदारसंघात आहे म्हणून मी आज पत्रकार परिषद घेऊ आहे. तो पुतळा पडला हे दुर्दैवी. पण सामनामध्ये ज्या प्रकारची भाषा वापरण्यात आली तशी वापरू नये. मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणणारे उद्धव ठाकरे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असे बोलतो, कोण आहेस तू? 

उद्धवची लायकी आहे का मोदीं बोलायची

उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने यांना संपवलं असतं असं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना उद्देशून बोललं होतं. उद्धव तुझी लायकी नाही मोदींना बोलायची. तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी बघितला नाही. एकदा एक काम करण्यासाठी याने बिल्डरकडून 3 लाख रुपये घेतले होते. आमच्या रवी शेंडगेकडून मिलिंद नार्वेकरने 3 लाख घेतले होते. आदित्य ठाकरेने 15 टक्के कमिशन घेतले. त्यामुळे यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये. तू कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. प्रशासन नाही, कायदा माहीत नाही, काय होणार मुखमंत्री? 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram