ABP Majha Headlines : 10 AM : 8 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  10  AM : 8 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

घरगुती सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त, महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचं गृहिणींना गिफ्ट, सोशल माध्यमावर मोदींची घोषणा.
दक्षिण मुंबईच्या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच, दक्षिण मुंबईची जागा भाजपसाठी सोडण्यास 
शिवसेनेचा नकार. मोदी फॅक्टरमुळे भाजप दक्षिण मुंबई सहज जिंकेल असं भाजपचं मत.
इंडिया आघाडी भाजप विरोधात उभी आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आमच्याकडे भाजपसोबत जाणार नाही असं लेखी मागणं योग्य नाही. लेखी अँफिडेविट करून अनेक लोकं पळून  गेलेत त्यामुळे असं लेखी मागणी कितपत योग्य? विनायक राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सवाल.
आघाडीत सर्वांच्या मनाप्रमाणं ठरत नाही, त्यामुळे  प्रकाश आंबेडकरांनी हट्ट सोडावा, संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला. 
नार्वेकरांनी घटनेची पायमल्ली करत शिंदे गटाला पात्र ठरवलं,  नार्वेकरांचा निकाल कोर्टाच्या निर्णयाशी विसंगत, लवादानं चोर मंडळाच्या बाजूनं निकाल दिला, संजय राऊतांची टीका. 
कटकारस्थान करणाऱ्यांसोबत यापुढे जाणार नाही, ज्या अमित शहा, नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी शिवसेना तोडून कमजोर करण्याचा प्रयत्न केला, संजय राऊतांचा आरोप
कटकारस्थान करणाऱ्यांसोबत यापुढे जाणार नाही, ज्या अमित शहा, नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी शिवसेना तोडून कमजोर करण्याचा प्रयत्न केला, संजय राऊतांचा आरोप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram