ABP Majha Headlines : 08 AM : 14 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 08 AM : 14 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुंबईत पावसाची १९ जूनपर्यंत विश्रांती, सहन करावे लागणार उन्हाचे चटके, पुढील पाच दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण नाही
भाजीपाल्याच्या दरात ४० ते ५० टक्के वाढ, आवक घटल्याने भाज्या महागल्या
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर अटकेची टांगती तलवार, अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी, येडियुरप्पांच्या अटकपूर्व जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी
G7 परिषदेसाठी सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी इटलीत दाखल, आज जागतिक नेत्यांसह द्विपक्षिय चर्चा करणार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, उर्जा, आफ्रिकेसंदर्भातल्या परिसंवादात मोदींचा सहभाग
रशियात नदीत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांवर आज अंत्यसंस्कार, काल रात्री उशिरा तिघांचे पार्थिव मूळगावी रवाना, भडगाव आणि अमळनेर इथे अंत्यसंस्कार
४५ भारतीयांचे मृतदेह घेऊन हवाई दलाचं विशेष विमान कुवेतहून कोच्चीत दाखल, मृतांमध्ये २३ जण केरळ, ७ तामिळनाडू आणि एक कर्नाटकातील