ABP Majha Headlines : 8 AM : सकाळी 8 च्या हेडलाईन्स एबीपी माझा : 05 Dec 2024 : ABP Majha

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 8 AM : सकाळी 8 च्या हेडलाईन्स एबीपी माझा : 05 Dec 2024 : ABP Majha
शपथविधीला अवघे काही तास उरले असताना एकनाथ शिंदेंच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम...काल दिवसभरात दोनदा फडणवीसांनी शिंदेंची वर्षा निवासस्थानी घेतली भेट...
नव्या सरकारचा आज संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी...मुंबईच्या आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
शिंदेंचं माहिती नाही, मी मात्र शपथ घेणार, पत्रकार परिषदेत अजित पवारांची टोलेबाजी...तर दादांना सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळा शपथ घेण्याचा अनुभव, शिंदेंचाही टोला.
उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांना शपथविधीचं निमंत्रण...सर्व माजी मुख्यमंत्री आणि सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही बोलावल्याची सूत्रांची माहिती...
शपथविधी सोहळ्यासाठी भाजपमध्ये उत्साह...८०० महिला कार्यकर्त्या नागपूरहून निघाल्या...तर पुण्यात मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे खास तुकाराम महाराज पगडी तयार...
बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी राजीनामा देण्यास तयार, नाना पटोंलेंची घोषणा, आयोगाला मतपत्रिकेवर मतदान घेण्याचं सांगावं, पटोलेचं भाजप नेत्यांना आव्हान....
काँग्रेस खासदार प्रियंका गांधींनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट, वायनाडमधील भूस्खलन पीडितांसाठी तात्काळ निधी देण्याची मागणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola