ABP Majha Headlines 7AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 02 Oct 2024 Marathi News

Continues below advertisement

महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्र २०२९मध्ये एकट्या भाजपचंच सरकार येणार.. भाजप मेळाव्यात अमित शाहांचं वक्तव्य...सत्तेसाठी साम, दाम, दंड भेदाचा वापर करण्याच्या सूचना...
२०२९ ला अजून बराच वेळ, एका पक्षाचं महाराष्ट्रात सरकार येऊ शकत नाही..अमित शाहांच्या दाव्यावर एकनाथ शिंदे, अजित पवारांचं वक्तव्य.. तर शाहांची भविष्यवाणी हास्यास्पद, जयंत पाटलांची टीका..
नागपूरमध्ये आज भाजपची महत्वाची बैठक, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे बैठकीला राहणार उपस्थित 
मविआचं जागावाटप उद्यापर्यंत जवळपास पूर्ण होणार तर दसऱ्याच्या मुहूर्तावर तिन्ही पक्ष जागावाटप जाहीर करणार, बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची माहिती
राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
सुनील केदारांना विधानसभा निवडणूक लढवता येण्याची शक्यता धूसर, नागपूर बँक घोटाळ्यातील शिक्षेमुळे आमदारकी लांबली
 कोल्ड प्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी बुक माय शोच्या सीईओला तिसरे समन्स, आज पोलिसांसमोर हजर राहण्याच्या सूचना.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram