ABP Majha Headlines : 6:30 AM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6:30 AM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक, फडणवीस, दानवे, मुनगंटीवार यांची अमित शाह, जेपी नड्डा, बीएल संतोष यांच्यासोबत चर्चा
भाजपची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी लांबणीवर, ८ मार्चला मोदींच्या आसाम दौऱ्यामुळे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आता १० मार्चला
जागावाटपाची चर्चा झालीच नसल्याचा वंचितच्या प्रवक्त्यांचा दावा, दोन दिवसांत नवा प्रस्ताव देण्याचा मविआ नेत्यांचा आग्रह, बुधवारची बैठकही निर्णयाविना, पुढील बैठक शनिवारी
नऊ तारखेला पुन्हा महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकरांसोबत बैठक होणार, जागांबाबत अंतिम निर्णय होणार, काल झालेल्या बैठकीत १७ जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती.
आज पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प, पुणेकरांना कोणत्या योजनांसाठी किती निधी मिळणार, करवाढ होणार का याकडे पुणेकरांचं लक्ष
उद्धव ठाकरे आज आणि उद्या धाराशिव जिल्हाच्या दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा
मनसेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे तीन दिवस नाशिक दौऱ्यावर, तर नाशिकमध्ये भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर
महाराष्ट्रात बेकायदेशीर जुगाराबाबत संजय राऊतांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, ऑनलाईन लॉटरी हा जुगार असल्याचा दावा