ABP Majha Headlines : 1:00PM : 7 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  1:00PM : 7 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

नवी मुंबईत  अनेक ठिकाणी पूरस्थिती, पडघा परिसरातील वाहनं वाहून जातानाची दृश्यं कॅमेऱ्यात कैद, 
कळंबोलीमध्ये मुसळधार पावसानं रेल्वे रुळांवर पाणी, कोकणात जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या रखडल्या...प्रवाशांची रेल्वे रुळांवरुन पायपीट...
ठाण्यातील शहापूरच्या वाशिंदमधलं सृष्टी फार्म हाऊस पाण्याखाली, वीकेंडसाठी आलेल्या दीडशे पर्यटकांची  NDRFकडून सुटका
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसानं निर्मला नदीला पूर,चार पूल गेले पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...
संगमेश्वरमधल्या गड नदीला पूर, माखजनच्या बाजारपेठेत शिरलं पाणी, नदीकाठच्या गावातली शेतीही पाण्याखाली...
वरळीत 'हिट अॅण्ड रन'ची घटना, कारने दुचाकीवरील दोघांना फरफटत नेलं, दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू 
मुंबईतल्या हिट अँड रन दुर्घटनेतली गाडी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांची, मुलगा मिहीर चालवत होता गाडी, अपघातानंतर ड्रायवरसह मिहीर शहा फरार..
रत्नागिरीमध्ये गो हत्या आणि गोमांसाच्या विरोधात मोर्चा, निलेश राणेंच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस मुख्यालयावर मोर्चा...
कोल्हापुरातील विशाळगडाच्या पायथ्याशी महाआरती, विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेला वेग, प्रलंबित याचिका लवकर निकाली करण्याचीही मागणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram