ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलान्स : 7 AM : 09 Feb 2025 : ABP Majha

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलान्स : 7 AM : 09 Feb 2025 : ABP Majha 
 दिल्लीत आम आदमी पक्षाचा सुपडासाफ...४८ जागा जिंकत तब्बल २७ वर्षांनंतर भाजपची सत्तेत वापसी...काँग्रेसची शून्याची परंपरा कायम... 
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा धक्कादायक पराभव...भाजपचे परवेश वर्मा ठरले जायंट किलर...सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावणार, केजरीवालांची प्रतिक्रिया... 
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पराभवाची हॅटट्रिक, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, काँग्रेसचा डीएनए अर्बन नक्षलवादाचा म्हणत केली टीका... 
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, १५ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाचा इशारा, रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज, फडणवीसांवरही हल्लाबोल 
२०१९ मध्ये निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी हातमिळवणी केल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा...आपले फोनही उचलण्याचं ठाकरेंनी बंद केल्याची फडणवीसांची माहिती... 
राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असताना किरण सामंतांचं मोठं वक्तव्य...आपल्याला आणि उदय सामंतांना विश्वासात घेऊनच शिंदे निर्णय घेणार, सामंतांचा दावा..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola