ABP Majha Headlines : 8 PM : 6 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  8 PM : 6 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

" शिंदेजी तुमचे बैर नही देवेंद्र तेरी खैर नही!" अशी टॅगलाईन वापरत राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रवक्त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावर भाजप नेते आ. संजय कुटे यांनी चांगलाच पलटवार केला आहे. सुप्रिया सुळे या राज्याच्या सो कॉल्ड नेत्या असून त्यांनी असं वक्तव्य करून त्यांची जातीयवादी मानसिकता दाखवून दिली आहे, अशी टीका भाजप नेते आमदार संजय कुटे यांनी केली. ते एबीपी माझाशी बोलत होते.   लोकाभिमुख काम केल्याने जनतेनेच महायुतीचा मेगा प्लॅन ठरवला  संजय कुटे म्हणाले, लोकाभिमुख काम केल्याने जनतेनेच महायुतीचा मेगा प्लॅन ठरवला आहे. नितीन गडकरी यांनी राज्यात प्रचार केल्याने देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यांचा आम्हाला मोठा फायदा होणार आहे. सुप्रिया सुळे या सो कॉल्ड नेत्या आहेत. त्यांची शिदोरी फक्त त्या शरद पवार यांच्या कन्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांची जातीयवादी मानसिकता समोर आली आहे. शरद पवार यांनी जसं त्यांना शिकवलं तसं त्या बोलतात. मात्र याचा देवेंद्रजींवर कुठलाही परिणाम होणार नाही. खालच्या दर्जच्या राजकारणाला देवेंद्रजी विकासातून उत्तर देतील.  आजकाल विरोधकांची टीका म्हणजे मजाक आणि हसण्याचा विषय  पुढे बोलताना संजय कुटे म्हणाले, आजकाल विरोधकांची टीका म्हणजे मजाक आणि हसण्याचा विषय आहे. नेहमी खोटं बोलणारे देशाच्या एजन्सीला खोटं ठरवतात. यांना खोटं बोलण्याची कावीळ झाली आहे. महायुतीत लाडकी बहीण योजनेबद्दल कुठलेही मतभेद नाहीत. SOP मुळे काही लोकांची फसवणुकीची मानसिकता असते त्याला आळा बसेल. पोलीस दलावर बोलताना नेत्यांनी त्यांचा आदर होईल असच बोलावं . आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही राबवलेल्या लोक अभिमुख योजनेच्या आधारावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत . आमच्यापुढे आव्हान नसून माहविकास आघाडी समोर आव्हान आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram