ABP Majha Headlines : 6 PM : 6 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

 ABP Majha Headlines :  6 PM : 6 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

उल्हासनगरमध्ये दारुड्या रिक्षा चालकाने मद्यपान करून एका युवतीला धडक दिली होती. या घटनेनंतर वाहतूक पोलीस मोहन पाटील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रिक्षा चालकाला  मध्यवर्ती पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मद्यधुंद रिक्षा चालकांकडून वाहतूक पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांना मारहाण केल्यानंतर रिक्षा चालकांनी पळ काढलाय. यामध्ये पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.   रिक्षा चालकाची वाहतूक पोलिसांना बेदम मारहाण  अधिकची माहिती अशी की, रिक्षा चालकाचा एका महिलेसोबत वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी वाहतूक पोलीस मोहन पाटील घटनास्थळी गेले होते. रिक्षा चालकाशी विचारपूस केली रिक्षा चालक मद्यधुंद असल्याची प्राथमिक माहिती त्यांना मिळाली. रिक्षा चालकाने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस  रिक्षा चालकाला पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. पोलीस आणि वॉर्डन यांनी देखील रिक्षा चालकाला मारहाण केली आहे. पोलीस मोहन पाटील यांना मारहाण झाल्यानंतर ते जमिनीवर पडले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.   रिक्शा चालकाने मद्यपान करून एका युवतीला धडक दिली. या घटनेनंतर वाहतूक पोलीस मोहन पाटील घटनास्थळी पोहोचले. ऑटो चालकाला मध्यवर्ती पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे. दोन रिक्षा चालकांनी  पोलिसांना मारहाण करुन पळ काढला आहे. यामध्ये पोलीस जखमी झाले आहेत. रिक्षा चालकाचा एका महिलेसोबत वाद सुरू होता. वाहतूक कोंडी झाल्याने पोलीस घटनस्थळी पोहोचले आणि सुरू असलेला वाद  मिटवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी सुरु केली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram