ABP Majha Headlines : 6 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

घरातला वडिलधारी गमावला, रतन टाटांना अखेरचा निरोप देताना १४० कोटी भारतीयांची भावना, उद्योगमहर्षींवर वरळीतल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, महाराष्ट्र सरकारची केंद्राला विनंती, राज ठाकरेंचही पंतप्रधानांना पत्र

महाराष्ट्र सरकारची रतन टाटांना विशेष श्रद्धांजली, उद्योग पुरस्कार आणि उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव

रतन टाटांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गज नेत्यांची हजेरी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली

भारताच्या प्रगतीचा शिल्पकार हरपला, उद्योगविश्वाकडून रतन टाटांना आदरांजली...कुमारमंगलम बिर्ला, अंबानी कुटुंबियांनी एनसीपीएमध्ये घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन...

पार्थिवाचं दर्शन घेत भारतरत्न सचिन तेंडुलकरकडून रतन टाटांना भावपूर्ण श्रद्धांजली, आमीर खान आणि किरण रावकडूनही पार्थिवाचं दर्शन

रतन टाटांवर वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार.. रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय लोटला..

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महत्त्वाचे ८० निर्णय...अंगणवाडी केंद्रामध्ये सुरू होणार पाळणाघरं... अनेक समाजासाठी महामंडळाची घोषणा स्थापन करण्यासही मंजुरी...

पत्रकार आणि वृतपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, शिंदे सरकारचा आणखी एक महत्वाचा निर्णय

धनगड राज्यात नाहीतच हे सांगणारं शुद्धिपत्रक रद्द करण्याची सरकारवर नामुष्की... चुकीचं शुद्धिपत्रक काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची धनगर समाजाची मागणी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram