ABP Majha Headlines : 6 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्र २०२९मध्ये एकट्या भाजपचंच सरकार येणार.. भाजप मेळाव्याच्या बैठकीत अमित शाहांचं मोठं वक्तव्य...
अतिआत्मविश्वासामुळे आपली विकेट पडू देऊ नका, भाजपच्या मेळावा बैठकीत फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र.. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपल्याचीही केली टीका..
'लव्ह जिहाद'च्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा, अनेक प्रकरणात खोटी ओळख दाखवून लग्न झाल्याचाही उल्लेख
शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार... मेळाव्यासाठी तब्बल ४० हजार शिवसैनिकांची आसन व्यवस्था...फुटीनंतरचा तिसरा दसरा मेळावा...
राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुप्रिया सुळेंचं विधान
घटस्थापनेपर्यंत मविआचं जागावाटप बहुतांश पूर्ण होणार तर दसऱ्याच्या मुहूर्तावर तिन्ही पक्ष जागावाटप जाहीर करणार, बैठकीनंतर आव्हाडांची माहिती
शरद पवारांचा पुन्हा एकदा अजितदादांना धक्का...भोसरीचे माजी आमदार विलास लांडे फुंकणार तुतारी... जुन्नरचे आमदार अतुल बेनके समर्थकही शरद पवारांच्या भेटीला...