ABP Majha Headlines : 6.30 AM : 23 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6.30 AM : 23 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
रशियाची राजधानी मॉक्सोमध्ये आयसिसचा हल्ला,७० जणांचा मृत्यू तर दीडशे जण जखमी, म्युझिक कॉन्सर्ट सुरू असताना निष्पाप नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार
अरविंद केजरीवाल यांना २८ तारखेपर्यंत ईडी कोठडी, केजरीवाल हेच मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार, ईडीचा आरोप
शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती..अमोल कोल्हेंविरोधात आढळराव पाटील निवडणूक लढण्याची शक्यता
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, महाराष्ट्राची उर्वरित यादी जाहीर होण्याची शक्यता
शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी निश्चित.. बारामतीतून सुप्रिया सुळे, माढातून रासपचे महादेव जानकर तर नगर दक्षिणमधून निलेश लंकेंना लोकसभेची उमेदवारी निश्चित
सत्तेसाठी पिसाळलेला उद्धव ठाकरे मोदींना औरंगजेब म्हणतोय, चंद्रशेख बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख
सांगलीचा उमेदवार उद्धव ठाकरेंनी जाहीर करण्यावर नाना पटोलेंचा आक्षेप, घोषणा प्रॉब्लेमॅटिक असल्याची प्रतिक्रिया, तर सांगलीबाबत दिल्लीत चर्चा करु, राऊतांची सारवासारव
अभिनेता गोविंदा अहुजा शिंदे गटात प्रवेश करणार, खात्रीलायक सूत्रांची माहिती, उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता
उदयनराजे आणि अमित शाहांची आज भेट होण्याची शक्यता, उदयनराजे बुधवार रात्रीपासून दिल्लीत
बीएमसीचे माजी आयुक्त इक्बालसिंह चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती, चहल यांच्या नियुक्तीवरून आदित्य ठाकरेंची टीका