ABP Majha Headlines : 6:30 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  6:30 AM : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

मुंबईतील एका भाविकाकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ११ लाख रुपयांची देणगी, जयंत म्हैसेकर असं या भाविकाचं नाव, म्हैसकर यांनी आतापर्यंत मंदिर समितीला दान केले एक कोटी रुपये, मंदिर समितीकडून म्हैसकर यांचा सत्कार. 

महेश नवमीनिमित्त अमरावतीमध्ये शोभायात्रेचं आयोजन, हजारो माहेश्वरी समाजबांधव आणि भगिनींचा यात्रेत सहभाग. 

कोल्हापूरचं ग्रामदैवत कपीलेश्वर मंदिरात चोरी, मंदिरातील मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुखवटा,  शिवलिंगावरचे तांब्याचे अभिषेकपात्र आणि पूजेच सर्व साहित्य चोरीला. 

कोल्हापूची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका माता या तीन शक्तिपीठांना जोडणारा महामार्ग वादाच्या भोवऱ्यात, कोल्हापूरसह १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध. 

शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून १८ जूनला महामोर्चा काढला जाणार, या महामार्गामुळे शेतकऱ्यांकडे जमिनी राहणार नाही, त्यामुळे अनेक मार्ग असताना या महामार्गाची गरज काय? शाहू महाराज यांचा सवाल. 

तुळजापुरात सिंहासन दानपेटी घोटाळ्याप्रकरणी हिंदू जनजागृती समिती आक्रमक, तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वारावर केलं घंटानाद आंदोलन, तुळजाभवानी देवीच्या मंदिरात झालेल्या भ्रष्टाचाराचे गुन्हे तात्काळ दाखल करण्याची मागणी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram