ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 12 March 2023 : Maharashtra News

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 12 March 2023 : Maharashtra News

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात..यात्रा आज नंदुरबारमध्ये प्रवेश करणार तर मुंबईतील शिवाजी पार्कात समारोप होणार.
काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होणार, मात्र महाराष्ट्राचे उमेदवार तिसऱ्या यादीत असण्याची शक्यता
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील २५ जागांवर चर्चा, नागपूरमधून नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडेंच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती, आज होऊ शकते उमेदवारांची घोषणा
नवी दिल्लीत आज होऊ शकते महायुतीची बैठक, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार अमित शाहांशी करणार चर्चा
शरद पवारांच्या मेळाव्याकडे बारामतीमधील व्यापाऱ्यांची पाठ..५० वर्षात पहिल्यांदाच व्यापाऱ्यांनी बैठक घेणं शक्य नाही कळवलं, मेळाव्यात शरद पवारांचं विधान
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश..उद्धव ठाकरेंकडून सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा
निवडणूक रोख्यांचे सर्व आकडे आज स्टेेट बँक सुप्रीम कोर्टाला देणार, १५ मार्च रोजी निवडणूक आयोग आकडे सार्वजनिक करणार 
केंद्र सरकारकडून सीएएची अधिसूचना जारी..देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू, लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
अमरावतीत आयुक्तालयाबाहेर तुफान राडा, पांढरी खानमपूरच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरुन जमावाची पोलिसांवर दगडफेक तर पोलिसांकडून लाठीचार्ज 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola