ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 03 जानेवारी 2024 : ABP Majha

अपात्र असूनही लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्यांकडून पैसे परत घेणार नाही, मंत्री आदिती तटकरेंची माझाला माहिती, तर तक्रारीनंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरू
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी..तर एसआयटी अहवालानंतरच राजीनाम्याचा निर्णय़ होईल...मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्ट
मुंडेंना बाजूला करुन भुजबळांना मंत्रिपद देणार का, सरपंच हत्येवरून होणाऱ्या आरोपांवर बोट ठेवत वडेट्टीवारांचा प्रश्न...माझ्यासाठी कुणाचं मंत्रिपद काढू नये,  भुजबळांची प्रतिक्रिया...
सीआयडी ऑफिस गाठण्यासाठी वाल्मिक कराडने वापरलेली स्कॉर्पिओ अजित पवारांच्या ताफ्यातली, आमदार धस आणि खासदार सोनवणेंचा उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी उज्वल निकमांना विनंती करणार, सुऱेश धस यांच्या विनंतीचा मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक विचार
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम, साताऱ्याच्या नायगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्री, भुजबळांसह अनेक मंत्री राहणार उपस्थित
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुती तुटण्याची शक्यता. पिंपरी-चिंचवड पालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola