ABP Majha Headlines : 5 PM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  5 PM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाटेला गेलात तर मी सोडत नाही, आमदार सुनील शेळकेंना पवारांचा इशारा,  सुनील शेळकेंचंही प्रत्युत्तर
शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली हीच मोदी गॅरेंटी, शरद पवारांची मोदी सरकारवर कडाडून टीका, बळीराजावर हे दिवस आणणाऱ्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही, पवारांची टीका
२०४७ साली भारत विकसित होईल पण तोपर्यंत इथल्या गरीब शेतकऱ्यांनी वाट पाहायची का, त्याला आज काय देणार सांगा, उद्धव ठाकरेंचा थेट मोदींवर घणाघात
महायुतीच्या जागावाटपात मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता, शिंदे - अजित पवारांचे काही उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता 
लोकसभेच्या जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी, केसाने गळा कापू नका, विश्वासघात करू नका, राज्यातल्या भाजप नेत्यांना रामदास कदमांचा इशारा
रामदास कदमांना टोकाची वक्तव्य करण्याची सवयच.. भाजपचा मुख्यमंत्री शिंदेंना पूर्ण पाठिंबा, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया तर महायुतीत केवळ दोन ते तीन जागांवरून किरकोळ मतभिन्नता, फडणवीसांचं विधान
उमेदवारांची दुसरी यादी निश्चित करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक, रात्रीच्या बैठकीत तब्बल १५० जागांवर चर्चा, रविवारी शिक्कामोर्तब
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी ८ एप्रिलला पुढील सुनावणी, अध्यक्षांपुढील सुनावणीतली
मूळ कागदपत्रं सुप्रीम कोर्टाने मागवली

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram