ABP Majha Headlines : 5 PM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट, दोन्ही शिवसेनेच्या चिंतेत वाढ

शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी, निवडणुकीच्या तोंडावर मशाल पेटवणार..तोफेच्या तोंडी कोण कोण राहणार याची उत्कंठा...

आझाद मैदानावर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याची जय्यत तयारी, ठाकरे आणि मविआ राहणार शिंदेंच्या रडारवर..

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सगळ्या मागण्या मान्य करा, मनोज जरांगेंनी थोपटले दंड, अडवणूक झाली तर उठाव करावाच लागेल असा इशारा.. 

काली माता बनून परत आलेय, पंकजांचा भगवान भक्तीगडावरून एल्गार, लोकसभेला हरले तरी थकले नाही असा निर्धार...

भक्तीगडावरच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचा मुलगा आर्यमनची हजेरी. बीडच्या राजकारणात आर्यमनची एन्ट्री होणार का? चर्चांना उधाण

ऐन दसऱ्याच्या दिवशी राज ठाकरेंची स्वबळाची घोषणा, मनसेला संधी द्या असं पॉडकास्टमध्ये आवाहन...तुमची प्रतारणा केलेल्यांना क्रांती घडवून धडा शिकवा असा सल्ला...

गुंडगिरी कुणाचीही असो, ती क्षम्य नाही, गुंडगिरी चालू देऊ नका, विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालकांचं जनसामान्यांना आवाहन, समाजाने संघटित राहण्याचाही दिला सल्ला

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram