ABP Majha Headlines : 9 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

 ABP Majha Headlines :  9 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

लोकसभेच्या वेळी पवार साहेबांवर जी काही वक्तव्य करण्यात आली ती माझ्या मनाला लागली. लोकांसाठी ते जरी पवार साहेब असले तरी आमच्यासाठी ते काका आहेत. तरीही टीका करण्यात आली. त्याचमुळे साहेबांसोबत खंबीरपणे राहण्याचा निर्णय घेतल्याचं श्रीनिवास पवार म्हणाले. बारामती काय आहे हे महाराष्ट्राला समजलं नाही, विधानसभेलाही बारामतीकर शरद पवारांनाच साथ देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या निवडणुकीवेळी बहिणीच्या विरोधात अजित पवारांनी स्वतःच्या पत्नीला उभे केल्याची भूमिका पटली नसल्याने त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पाटील यांनी शरद पवारांची साथ दिली होती.   अजितदादांना समजावण्याचा प्रयत्न केला श्रीनिवास पवार म्हणाले की, एकदा बाजू घेतली तर नंतर बाजू बदलणं अवघड होतं. एकत्र कुटुंब असताना राजकारणात नव्हतो. त्यावेळी हे सगळं बाहेरून पाहत होतो. अजित पवारांनी साहेबांना सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर  त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. लोकसभेच्या निवडणुकीवेळी साहेबांवर चुकीच्या भाषेत टीका करण्यात आली. त्यामुळे साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला.   मी राजकारणात कधीही येणार नाही. युगेंद्र हे साहेबांच्या बाजूने होते. आताही त्यांच्यासोबत फिरतात. उद्या बारामतीतून तिकीट कुणाला मिळणार हे साहेब ठरवतील. सगळ्यांच्या विचारानेच उमेदवार ठरेल असं श्रीनिवास पवार म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram