ABP Majha Headlines : 9 PM : 4 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  9 PM : 4 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

भाजपमधील नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  (Harshvardhan Patil) यांनी आज भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली. इंदापूरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या मेळाव्यापूर्वीच त्यांचा मुलगा आणि कन्या या दोघांनीही तुतारीचं स्टेटस ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर, आजच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेत आपली भूमिकाही स्पष्ट केली. मात्र, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष प्रवेशाची तारीख ठरली नव्हती. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हर्षवर्धन पाटील यांचे पक्षात स्वागत केलं आहे. तसेच, त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीखही जाहीर केली. त्यामुळे, हर्षवर्धन पाटील यांच्या तुतारी हाती घेण्याच्या तारखेवरही आता शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र, या निर्णयानंतर इंदापुरात पुन्हा बॅनर झळकू लागले आहेत. शरद पवार यांच्या भूमिकेवरच आता काहींनी प्रश्न उपस्थित केल्याचंही पाहायला मिळालं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram