ABP Majha Headlines : 31 OCT 2024 : 06 PM : TOP Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 31 OCT 2024 : 06 PM  : TOP Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स
विधानसभेसाठी मनोज जरांगेंकडून मराठा, मुस्लिम आणि दलित समीकरणाची जुळवाजुळव, कोणत्या मतदारसंघात उमेदवार उभे करणार याची तीन तारखेला घोषणा
जे बंडखोर माघार घेणार नाही त्यांच्यावर कारवाई, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा इशारा, तर काँग्रेसमधील 36 बंडखोरांना चेन्नीथलांचा फोन, पवार आणि ठाकरेंसमोरही बंडोबांचं आव्हान
महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? माझा व्हिजनमध्ये राज ठाकरेंनी भाजपावर शिक्का मारल्यानं चर्चेला तोंड, फडणवीस-शिंदेंची सावध प्रतिक्रिया
महायुतीला राज्यात २०० जागा मिळतील, एबीपी माझाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आत्मविश्वासपूर्ण दावा...
मुंबई महापालिकेचा विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचा मोठा चेहरा भाजपात, रवी राजांना मुंबई भाजपचं उपाध्यक्षपद, वर्षा गायकवाडांवर घराणेशाहीचा आरोप
कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी न मिळाल्यानं जयश्री जाधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, हाती धनुष्यबाण घेताना काँग्रेसवर हल्लाबोल
चिंचवडमधून बंडखोरी करणाऱ्या नाना काटेंच्या मनधरणीचा अजित पवारांकडून प्रयत्न... काटे मात्र अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम... 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram