ABP Majha Headlines : 7:00 AM : 30 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  7:00 AM : 30 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाला पोषक स्थिती होती. दरम्यान, अरबी समुद्रात वाढलेल्या आर्द्रतेमुळं राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. आता चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या उत्तर प्रदेश आणि परिसरात आहे. उत्तरेकडील राज्यात दाट धुकं आणि थंडीची लाट आहे. परिणामी राज्यात कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार आहेत. (Dry Weather) येत्या चार ते पाच दिवसात राज्यात पुन्हा किमान तापमानात घटणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 2-4 अंश सेल्सियसने तापमान घसरणार आहे. (IMD Forecast)  येत्या चोवीस तासांत विदर्भात 4-5 अंशाने हळूहळू घसरणार आहे. येत्या पाच दिवसात विदर्भात कमाल तापमानात फारसा परिणाम जाणवणार नाही. येत्या चार दिवसात राज्यात पुन्हा थंडी जाणवायला लागणार असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवलंय.  तापमानात काय बदल होणार? हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात येत्या चार ते पाच दिवसात 1-2 अंशांनी वाढ होणार असून किमान तापमान 2-4 अंश सेल्सियसने कमी होणार आहे. विदर्भात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. तर किमान तापमानात येत्या 24 तासांत  4-5 अंशांनी घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram