ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 3 PM : 14 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

अजित पवारांपाठोपाठ पंकजा मुंडेंचाही 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध, महाराष्ट्रात या घोषणांची गरज नाही, विकासाबद्दल बोलायला हवं,पंकजा मुंडेंचं वक्तव्य
नाशिकमध्ये महायुती आणि मविआचा राडा, गणेश गितेंच्या वाहनावर भाजपने हल्ला केल्याचा आरोप, तर भाजपकडून पैसेवाटपाचा पलटवार, सुप्रिया सुळे सभा सोडून पोलीस आयुक्तालयात
मुख्यमंत्रिपदासाठी काही नवी नावं शक्य, भाजप नेते विनोद तावडेंचे संकेत,  निकालानंतर राजकीय-सामाजिक परिस्थिती पाहून निर्णय अपेक्षित
ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्यांना धडा शिकवण्यासाठी मुळकांना पाठिंबा, सुनील केदारांचा दावा.. तर बदला घेण्यासाठी आम्ही सक्षम, आघाडीधर्म पाळला असता तर बरं झालं असतं, विशाल बरबटेंचं उत्तर
सुनील केदार मारुतीच्या बेंबीतील विंचू, ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव रामटेकमधील बंडखोरीवरून संतापले, गद्दाराविरुद्ध गद्दार लढवण्याची आम्हाला गरज नसल्याचाही टोला..
डोंबिवलीत भाजप कार्यालयाची तोडफोड, भाजप नेते जुगल उपाध्याय यांना मारहाण, तीन ते चार अज्ञातांकडून शिवीगाळ करत तोडफोड
मनसेच्या १७ तारखेच्या सभेला शिवाजी पार्कचं मैदान मिळण्याची शक्यता, आजच परवानगीचं पत्र अपेक्षित, ठाकरे गटाची मागणी अमान्य होण्याची चिन्हं...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram