ABP Majha Headlines : 8 PM : 29 April 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  8  PM :  29 April 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स 

महाराष्ट्रात एका भटकत्या आत्म्याकडून नेहमी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, पुण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख 
धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचं काँग्रेसचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल 
राज्यात महाविकास नाही महाभकास आघाडी, तर विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नाही म्हणून राज्यघटना बदलण्याचा आरोप करतात, उदयनराजेंची टीका
पुलवामा भाजपने घडवला म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, चहावाल्या पंतप्रधानांसोबत गरिबाचा मुलगाच शोभतो, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले नाही, देवेंद्र फडणवीसांचा प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल
मुंबई, ठाण्यातील ठाकरेंच्या उमेदवारांचे अर्ज दाखल, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांना उमेदवारी, ठाण्यात राजन विचारेंच्या शक्तिप्रदर्शनात आदित्य ठाकरेंची हजेरी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram