ABP Majha Headlines : 04 PM : 28 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  04 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

अभिनेता गोविंदा अहुजा आज शिंदे गटात प्रवेश करणार, उत्तर पश्चिम मुंबईतून गोविंदाला शिवसेनेकडून उमेदवारीची शक्यता

संजय राऊतांनी पाठीत खंजीर खुपसला, प्रकाश आंबेडकर यांचा राऊतांवर गंभीर आरोप, अकोल्यात विरोधात उमेदवार देत आपल्याला पाडण्याचा कट, आंबेडकरांचं खळबळजनक ट्विट

शिंदेंच्या १३ पैकी ११ खासदारांना पुन्हा संधी मिळणार, मुख्यमंत्र्यांचं खासदारांच्या बैठकीत आश्वासन, आज काही उमेदवारांची यादी जाहीर 
होण्याची शक्यता

ठाणे लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही, मात्र बालेकिल्ला असल्यानं ठाण्याची जागा आम्हालाच मिळावी, एकनाथ शिंदेंची भूमिका

महायुतीतील खदखद समोर. शिवसेनेच्याच जागेवर हट्ट का?, आता एक घाव दोन तुकडे होवून जाऊदे.. खोतकरांची संतप्त प्रतिक्रिया..

सांगलीचे काँग्रेस नेते विशाल पाटलांचं सूचक ट्विट, शायरीच्या माध्यमातून लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याचे संकेत

वेळ पडली तर नवनीत राणांविरोधात अपक्ष निवडणूक लढवणार, शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांची आक्रमक भूमिका, अभिजीत अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज घेतला

शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचं उघड बंड, लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरल्यामुळे संभ्रम

बारामतीमधून निवडणूक लढवण्याबाबत विजय शिवतारे उद्या भूमिका जाहीर करणार, काल रात्री घेतली शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची भेट

एका सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस देशाचं पंतप्रधानपद घालवणार आहे का, सजंय राऊतांचा काँग्रेसला सज्जड इशारा 

रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, लोकसभेच्या उमदेवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द, तातडीने दिलासा देण्यास नागपूर सत्र न्यायालयाचा नकार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram