ABP Majha Headlines : 7 AM : 28 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :   7 AM :  28 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

पंतप्रधान मोदींचा आज यवतमाळ दौरा, राज्यातल्या ४ हजार ९०० कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान करणार
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश, जरांगेंचा बोलविता धनी कोण, हे शोधणार, फडणवीसांचा इशारा 
कर नाही त्याला डर कशाला, एसआयटी चौकशीच्या आदेशावर जरांगेंची प्रतिक्रिया, चौकशी एकतर्फी नको सगळ्यांची करा, जरांगेंची मागणी
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जबाबदार व्यक्ती..त्यांनी केलेले आरोप पोरटकपणाचे, शरद पवारांचा हल्लाबोल.. तर जरांगेसोबत माझा काडीमात्र संवाद नाही, आमचे कॉलरेकॉर्ड तपासा, शरद पवारांचं आव्हान
सेंट्रल व्हिस्टाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरातील सात एकर जागेवर महाव्हिस्टा उभारणार..मंत्रालय, विधिमंडळ, मंत्री-आमदारांची निवासस्थाने एकाच ठिकाणी असणार.. एकूण साडेसात हजार कोटींहून अधिक खर्च प्रस्तावित 
राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर, धुळ्याच्या बारीपाडा इथल्या चैत्राम पवार यांना पुरस्कार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा. 
विख्यात गायिका कलापिनी कोमकली आणि प्रसिद्ध सतार वादक नीलाद्री कुमार यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर, १ लाख रुपये आणि ताम्रपत्र असं पुरस्काराचं स्वरुप
हिमाचल राज्यसभा निवडणुकीत मोठा उलटफेर, काँग्रेसच्या ६ आमदारांचं क्रॉस वोटींग, ईश्वर चिठ्ठीत
काँग्रेसच्या अभिषेक मनु सिंघवींचा पराभव, तर भाजपचे हर्ष महाजन विजयी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram