ABP Majha Headlines : 11 AM : 28 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 11 AM : 28 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महायुतीतील ३ जागांवर महिला उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता...ठाण्यातूून मीनाक्षी शिंदें, दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव तर नाशिकच्या जागेवर भक्ती गोडसेंची वर्णी लागण्याची शक्यता
माढ्यात फडणवीस शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत, शरद पवारांचे निकटवर्तीय अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, आज अभिजीत पाटलांची फडणवीसांसोबत बैठक
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, उत्तर-मध्य मुंबईतून अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत, संजय पाडेंची एबीपी माझाला माहिती
कोल्हापुरच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या रात्री उशिरापर्यंत बैठका...समरजितसिंह घाटगेंसोबत चर्चा, कागलमधून मंडलिकांना सर्वाधिक मताधिक्य देण्यासंदर्भात बैठकीत रणनीती
पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका, मोदींच्या सोमवार आणि मंगळवारी एकूण सहा सभा,सोमवारी सोलापूर, कराड, पुण्यात तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा