ABP Majha Headlines : 11 AM : 27 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 AM : 27 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण, हा एकच प्रश्न सर्वांना पडला आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्यालाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी जोरदार वातावरणनिर्मिती करुन भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, 137 आमदारांचे पाठबळ असलेल्या भाजपने हा दबाव झुगारुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच मुख्यमंत्री होतील, असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांना दिला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या (Maharashtra CM) शर्यतीमधून माघार घेतली असली तरी त्यांनी एक गुगली टाकल्यामुळे महायुतीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाच्या वृत्तानुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली होती.