ABP Majha Headlines 27 February 2024 3 PM Maharashtra News Manoj Jarange maratha reservation maratha protest

Continues below advertisement

ABP Majha Headlines :   10 AM :  27 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके, आज मराठी भाषा गौरव दिन, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद मुख्य प्रतोदपदी अमोल मिटकरी यांची वर्णी लागण्याची शक्यता, 
आज उपसभापती नीलम गोऱ्हे मिटकरींचं नाव घोषित करणार का याची उत्सुकता

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना २ वर्षांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता, मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक, लवकरच फाईलवर सही करणार असल्याची माहिती

कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर यांना मुंबई महापालिकेकडून दिलासा मिळणार असल्याची चर्चा, अर्जावर फेरविचार झाल्यास अवैध बांधकाम वैध ठरण्याची शक्यता 

महायुतीच्या लोकसभा जागावाटपासंदर्भात
अद्याप निर्णय नाही, दिल्लीतील पक्षश्रेष्ठी राज्यातील नेत्यांना वेळ देत नसल्याची चर्चा


हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव, प्रलंबित मागण्यांसाठी रात्रभर मुक्काम, मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार

पंतप्रधान मोदी उद्या यवतमाळ दौऱ्यावर, राज्यातल्या सुमारे ५ हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन करणार, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram