ABP Majha Headlines : 2 PM : 22 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 2 PM : 22 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सरकारचं १२ जणांचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी रवाना... संभाजीनगर विमानतळावर शिष्टमंडळाची खलबतं, हाकेंना लेखी आश्वासन द्यायचं की की नाही याची चर्चा
६० टक्के लोकांच्या भावनांकडे बघण्याची मुख्यमंत्र्यांची नियत दिसत नाही, उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, लेखी आश्वासन आल्याशिवाय ऐकणार नाही, हाकेंचा निर्धार
मराठा आणि ओबीसी आंदोलन प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक होणार, अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सर्वपक्षीय बैठक, गिरीश महाजनांची घोषणा
अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांसोबत
जावं, अमोल मिटकरींचं वक्तव्य, महायुतीत अजितदादांचं मानसिक खच्चीकरण सुरु असल्याचाही दावा
सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ३ हजार रुपयांचा दंड, कोरोनाकाळात वीजदरवाढ आंदोलनात बेस्टच्या महाव्यवस्थापनांना मारहाणीचा आरोप
खासदारांच्या शासकीय कार्यालयाचा ताबा घेण्यावरुन अमरावतीत राडा.... यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडेंनी कुलूप तोडून घेतला खासदार कार्यालयाचा ताबा
शेतीच्या पाणीपट्टीत २० टक्क्यांनी वाढ, दुष्काळापाठोपाठ शेतकऱ्यांवर पाणीपट्टीवाढीचं संकट, ऊस, केळीसह बारमाही पिकांना फटका बसण्याची शक्यता तर विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा
नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशन परिसरात तणावाची स्थिती, आक्षेपार्ह निनावी पत्रक व्हायरलप्रकरणी जमाव रस्त्यावर, दुकानं बंद करण्याचं आवाहन करत रास्तारोको
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोयता गँगचा हैदोस, वडगाव शेरीत पोलिसांच्या गाडीसह १५ ते २० गाड्यांची तोडफोड, कोयता गँगचं पोलिसांसमोर आव्हान