ABP Majha Headlines 9AM एबीपी माझा हेडलाईन्स 09 AM 22 July 2024 Marathi News

Continues below advertisement

मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात, वाहतुकीचा वेग मंदावला, लोकलही काही मिनिटं उशिरानं

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड  

कोल्हापुरातील पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, जिल्ह्यातले ८४ बंधारे पाण्याखाली, पूरस्थिती पाहून शाळा सुरु ठेवण्याच्या अधिकाऱ्यांच्या सूचना 

पूर्व विदर्भाला पावसानं झोडपलं..मुसळधार पावसामुळे नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडाऱ्यातील शाळा, काॅलेजला सुट्टी 

जुलै महिन्याची 22 तारीख उजाडली तरी उजनी धरण कोरडंच, धरणात सध्या उणे २२ टक्के पाणीसाठा  

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून, आर्थिक पाहणी अहवाल आज सादर करणार, तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या सादर करणार अर्थसंकल्प 

ओबीसींच्या आरक्षण बचावासाठी आजपासून लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्त्वात जनआक्रोश यात्रा, कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन केल्यास कारवाई करणार, पोलिसांची नोटीस 

मुंबईतील पाहडी गोरेगाव भागात म्हाडा अडीच हजार घरं उभारणार, येत्या काही दिवसांत सुरू करणार निविदा प्रक्रिया 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram