ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 06 PM : 22 May 2024 : Maharashtra News

Continues below advertisement

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी, शिवाजीनगर कोर्टाचा निकाल
पुण्यात वंदे मातरम् संघटनेकडून विशाल अगरवालवर शाईफेक, अगरवालला कोर्टात आणताना प्रकार, ५ ते ७ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण, अल्पवयीन मुलाला जेल की बेल?बाल न्याय मंडळ थोड्याच वेळात निकाल देणार.
कल्याणीनगर अपघातानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर, कोरेगाव परिसरातील आणखी ३ अवैध पबवर बुलडोझर
इंदापुरात भीमा नदी पात्रात बुडालेली बोट ३५ फूट खोल पाण्यात सापडली, बेपत्ता सहा प्रवासी दगावल्याची भीती, तर पावसामुळे शोधकार्य थांबवलं
गजानन कीर्तिकरांच्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी, कीर्तिकरांवर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता, शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल
मुंबईतील मविआच्या नेत्यांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सूचना पाठवणार, अधिकाऱ्यांचं मविआ नेत्यांना आश्वासन
अहमदनगरमध्ये EVM ठेवलेल्या गोदामाजवळ अज्ञाताकडून छेडछाड झाल्याचा निलेश लंकेंचा आरोप, तर ती व्यक्ती सीसीटीव्ही दुरुस्त करणारा कर्मचारी, जिल्हाधिकाऱ्याचंं स्पष्टीकरण
मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी नऊ दिवसांनी एसआयटीची स्थापना, गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांच्याकडून आदेश जारी तर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram