ABP Majha Headlines : 7 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, रामराजे निंबाळकर स्मार्ट खेळी करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही खूश करण्याच्या तयारीत आहेत. रामराजे निंबाळकर हे अजित पवारांसोबतच राहणार आहेत. तर त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटण कोरेगावचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. फलटण येथे रामराजे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आहे.
रामराजे निंबाळकर विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांचा 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. मात्र, उर्वरित 4 वर्षांचा कालावधी बाकी आहे, त्यामुळे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच राहतील असे बोलले जात आहे. सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटणचे आमदार दीपक चव्हाण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील. तर रामराजे अजित पवारांसोबतच राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.