ABP Majha Headlines : 2 PM : 13 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

 ABP Majha Headlines :  2 PM : 13 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

माजी राज्यमंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षातील नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकूण तीन आरोपींनी भर रस्त्यावर त्यांना गोळ्या घातल्या आहेत. यातील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तिसरा आरोपी फरार आहे. दरम्यान, याच तिसऱ्या फरार आरोपीचे आता समोर आले आहे. हा आरोपी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होता, असे समोर आले आहे.   स्क्रॅप डिलरकडे करायचा काम सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत सहाभागी असलेल्या तिसऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिसांनी तिसऱ्या व्यक्तीचे नाव शोधले आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या आरोपीची इतरही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या माहितीनुसार तिसरा आरोपी हा पुण्यात पाच ते सहा वर्षांपासून एका स्कॅप डिलरकडे काम करतोय. त्याने धर्मराज नावाच्या 19 वर्षीय आरोपीला काही महिन्यांपूर्वी पुण्यात बोलवून घेतलं होतं.    एका आरोपीवर याआधीच हत्येचा गुन्हा  त्यानंतर हत्येची सुपारी देणाऱ्या व्यक्तीने शिवा आणि धर्मराज यांची गुरुमेल याच्याशी भेट घडवून आणली होती.  गुरुमेल हा 23 वर्षांचा आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. याआधी त्याच्याविरोधात एक हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धर्मराज आणि गुरमेल यांच्या नावावर याआधी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram