ABP Majha Headlines : 9 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

 ABP Majha Headlines : 9 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जंगी तयारी केली जात आहे. काल भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यात महत्वाची बैठक झाली. या बैठकीत आरएसएसने भाजपला महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. 

निवडणुकीत जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून लांब जाऊ नये. भाजपच्या जुन्या कॅडरच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष नको, अशा सूचना नागपुरात संघ पदाधिकाऱ्यांच्यासोबतच्या बैठकीत भाजपला सूचना दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे संगठन कामाला लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपच्या तयारी आणि नियोजनाचा आढावा घेत आहे. यामध्ये काल (10 ऑक्टोबर) नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघातील तयारी, नियोजन, सामाजिक समीकरण आणि करावयाच्या कामांचा आढावा संघाकडून घेण्यात आला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram