ABP Majha Headlines : 8 AM :20 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 8 AM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परभणी आणि नांदेडमध्ये, महायुतीचे नांदेडचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि परभणीचे उमेदवार महादेव जानकरांच्या प्रचारासाठी मोदींची सभा.
काँग्रेसची नीती शेतकरी आणि गरीब विरोधी, पंतप्रधान मोदींचा वर्ध्यातून हल्लाबोल, संविधान गुंडाळून आणीबाणी लावण्याची मानसिकता गेली नाही, मोदींची टीका
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं देशात १०२ तर राज्यात ५ मतदारसंघात मतदान, राज्यात अंदाजे ५५ टक्के तर देशात अंदाजे ६० टक्के मतदान
नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार..  महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, भुजबळांची घोषणा 
नाशिक लोकसभेसाठी शिवसेनेतच स्पर्धा, हेमंत गोडसेंनंतर अजय बोेरस्ते यांनी देखील व्यक्त केली इच्छा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram