ABP Majha Headlines : 2 PM : 5 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 2 PM :  5 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ३० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन, आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा देखील मतदारांना दिला शब्द
सांगली काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्याचा पर्याय विचाराधीन, किंवा विधानसभेला उभे राहिल्यास पूर्ण पाठिंबा देण्याचाही पर्याय 
संजय राऊत आजपासून तीन दिवस सांगली दौऱ्यावर, विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांची मात्र दौऱ्याकडे पाठ
महाविकास आघाडीतल्या जागावाटपाच्या तिढ्याला अशोक चव्हाण जबाबदार, काँग्रेसच्या काही नेत्यांचा खासगीत बोलताना दावा, चव्हाणांनी सर्व आरोप फेटाळले
नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार, दोन ते तीन दिवसांत उमेदवारी जाहीर होईल, हेमंत गोडसेंचा एबीपी माझावर पुनरुच्चार 
छगन भुजबळ कुटुबीयांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज फेडण्यास सुरुवात, २८ कोटींपैकी साडे सहा कोटी भरले, उरलेली रक्कम टप्प्याटप्प्यानं फेडणार, उमेदवारीच्या शक्यतेमुळे भुजबळ खबरदारी घेत असल्याची चर्चा
रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याआधीच नारायण राणेंकडून प्रचाराचा धडाका, राजापूर आणि जयगडमध्ये उद्या सभा 
अभिनेता गोविंदा रामटेकमध्ये राजू पारवेंच्या प्रचारासाठी दाखल, उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेसाठी शिंदेंकडे तिकीट मागितलेलं नसल्याचा गोविदाचा पुनरुच्चार
अकोला दौऱ्यात नाना पटोलेंनी जॉनी वॉकरचा जबरदस्त अभिनय केला, वंचित बुहजन आघाडीची सडकून टीका

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram