ABP Majha Headlines : 02.00 PM : 20 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
भोंगेविरोधी आंदोलनात १७,००० मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल, २०१७ मध्ये झालेला युतीचा प्रयत्न उद्धव ठाकरेंमुळेच अयशस्वी झाल्याचा आरोप
महाराष्ट्र द्रोह्यांसह पंक्तीला बसणारेही महाराष्ट्रद्रोहीच, संजय राऊतांचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवली नसल्याचं केलं स्पष्ट
पुण्यातील तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालय़ाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल, सूर्या, मणिपाल, इंदिरा आयव्हीएफ रूग्णालयंही पोलिसांच्या रडारवर
मनसेच्या संदिप देशपांडेंच सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र, मराठ्यांचे मागील २०० वर्षातलं उदाहरण देताना तिथे कोणालाही सक्ती नव्हती मग आता ती सक्ती का? देशपांडेंचा सवाल, राज्य सरकारला सांगून सक्ती थांबवण्याचीही केली विनंती.
नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबारला सुरूवात...समस्या घेऊन आलेल्या नागपूरकरांची तुफान गर्दी...समस्येचं निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जनता दरबार...
अजित पवारांनी माझा राजीनामा स्वीकारलेला नाही, समीर भुजबळांचा दावा...तर समीर भुजबळ अजितदादांकडून हुसकलेला माणूस, सुहास कांदेंनी डिवचलं...
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संग्राम थोपटे थोड्याच वेळात पुढील भूमिका जाहीर करणार...भोरमध्ये थोपटेंच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुरू...भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता...