ABP Majha Headlines : 8 AM : 19 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  8 AM : 19 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

 राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय नेतेमंडळी आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील झाल्याचं पाहायला मिळालं. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा (Madha) मतदारसंघ हा अतिशय महत्वाचा मानला जातो. कारण, स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हा मतदारसंघ राहिला आहे. लोकसभेला शरद पवारांचा करिश्मा या मतदारसंघात पाहायला मिळाल्यानंतर आता विधानसभेसाठी या मतदारसंघातून इच्छुकांची संख्य मोठी आहे. विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (NCP) बाय बाय करत महाविकास आघाडीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, यंदा ते स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरणार नसून त्यांच्या सुपुत्रासाठी म्हणजे रणजित शिंदे यांच्यासाठी ते धावपळ करत आहेत. बबन शिंदे यांनी सातत्याने शरद पवारांची भेट घेऊन माढ्यातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त  केली आहे. दुसरीकडे साखर कारखानदार अभिजीत पाटील व रणजीतसिंह निंबाळकर हेही राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. 

माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवार कोण हे शेवटपर्यंत कोडच राहिलं. त्यात, विद्यमान आमदाराने अजित पवारांची साथ सोडल्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण याचीही उत्सुकता सर्वांना लागली होती. कारण, लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना चांगलं मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीकडून निवडणूक लढल्यास आपला विजय होईल, यासाठी अनेक नेत्यांनी फिल्डींग लावल्याचं पाहायला मिळालं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram