ABP Majha Headlines 12PM एबीपी माझा हेडलाईन्स 12 PM 19 July 2024 Marathi News

Continues below advertisement

मुंबई हायकोर्टाचा सरकारला दणका, शिक्षण हक्क कायद्यातून खाजगी आणि विनाअनुदानित शाळांना वगळण्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द, अचानक निर्णय घेणं घटनाबाह्य असं निरीक्षण .. 

शरद पवारांची आणखी एक मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य, ट्रम्पेट चिन्हाचा उल्लेख तुतारी न करता ट्रम्पेट असाच करणार... 

भ्रष्टाचाऱ्यांचा एकच  नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा, जयंत पाटलांची टीका, राज्य सरकारमधल्या भ्रष्टाचार आणि नाकर्तेपणाचा वाचला पाढा... 

भाजपचे नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवारांच्या भेटीची वेळ मागितली, पण वैभव पिचड म्हणतात, भाजपामध्येच राहणार.. 

विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याचे प्रयत्न, आठवले, कवाडे, गवई गट रिपब्लिकन आघाडीत सहभागी होण्याची शक्यता 

साताऱ्यामध्ये आणलेली वाघनखं उद्यापासून सामान्यांसाठी होणार खुली, संग्रहालयाला रोषणाई आणि आज भव्य सोहळा.. 

कुणीही सुपरमॅन बनू नये, सरसंघचालक मोहन भागवतांचा सल्ला, मनुष्याच्या महत्त्वाकांक्षेला सीमा नाही, असंही वक्तव्य 

मोहन भागवतांच्या वक्तव्याचा धागा पकडून संजय राऊतांची मोदींचं नाव न घेता टीका, मोदी सरकार आल्यापासून रेल्वे दुर्घटनेत ३०० लोक ठार झाल्याचा आरोप... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram