ABP Majha Headlines : 7 AM :19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 7 AM  :19 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला काही क्षणांत सुरुवात... पूर्व विदर्भातील पाच जागांवर मतदार बजावणार हक्क
देशातील २१ राज्यांमधल्या १०२ जागांवर आज मतदान, १६ कोटी भारतीय बजावणार लोकशाहीतला पवित्र हक्क 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस, नागपूर  मतदारसंघांकडे अवघ्या देशाचं लक्ष  
राज्यातील पाच जागांसह देशभरातील मतदानाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स फक्त एबीपी माझावर, ४ जूनला देशातील सर्वात मोठं महाकव्हरेज 
संरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं मतदान, नागपूरच्या भाऊजी दप्तरी शाळेतील मतदान केंद्रावर बजावला हक्क
नारायण राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत लढत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram