ABP Majha Headlines 12PM : दुपारी 2 च्या हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

राज्य मंत्रिमंडाळाची उद्या पुन्हा बैठक, एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा कॅबिनेट, आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका अपेक्षित
जागावाटपाबाबत महायुतीच्या वरिष्ठांची अमित शाहांसोबत  बैठक, तिढा असलेल्या जागांवर शाहांच्या उपस्थितीत तोडगा काढण्याचे प्रयत्न
महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्र २०२९मध्ये एकट्या भाजपचंच सरकार येणार.. भाजप मेळाव्यात अमित शाहांचं वक्तव्य...सत्तेसाठी साम, दाम, दंड भेदाचा वापर करण्याच्या सूचना...
२०२९ ला स्वबळाचा नारा म्हणजे अमित शाहांचं दिवास्वप्न, संजय राऊतांची बोचरी टीका, भाजपचं अध:पतन झाल्याचंही वक्तव्य
महाविकास आघाडीची आज तिसऱ्या दिवशीही बैठक, आतापर्यंत दीडशेहून अधिक जागांवर एकमत, मुंबईतील जागांसाठी स्वतंत्र समिती
चंद्रपुरात शिक्षकाचा शाळकरी मुलीवर अत्याचार, पॉक्सोअंतर्गत गुन्ह्याची नोंद, युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असलेल्या आरोपीला बेड्या
बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग स्थापन, चकमकीशी संबंधित सर्व घटनांचा तपशीलवार तपास करणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram