ABP Majha Headlines : 12 PM : 03 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 12 PM : 03 March  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

अमरावती लोकसभेवरुन आजी-माजी खासदार आमने-सामने, अमरावतीवरचा दावा सोडणार नाही, आनंदराव अडसूळांचा निर्धार, तर अडसूळ नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा टोला.

शिरुर आणि मावळच्या जागेवरुन महायुतीत तिढा, शिरुरमधून आढळरावांना राष्ट्रवादीतून उमेदवारी न देण्याची मागणी तर मावळमधून श्रीरंग बारणेंना भाजप आणि राष्ट्रवादीचा विरोध

वंचित बहुजन आघाडीची मविआसोबत युती झालेली नाही, आघाडीच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नका, प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन, तर येत्या २ दिवसांत चर्चा करु, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

वर्धा लोकसभेसाठी वंचितकडून संभाव्य उमेदवार जाहीर, प्रा.राजेंद्र साळुंखे यांच्या उमेदवारीला प्रकाश आंबेडकरांकडून हिरवा कंदिल

मनोज जरांगे आज बीड आणि धाराशिवच्या दौऱ्यावर, आंदोलनाच्या पुढील वाटचालीबाबत मराठा बांधवांशी चर्चा करणार.

डोंबिवलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह, नेतेमंडळी उपस्थित राहणार. 

रत्नागिरीतल्या जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे, 'माझा'च्या बातमीची केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून दखल, समुद्रात सुरू असलेलं काम तात्काळ थांबवण्याचे जेएसडब्ल्यू कंपनीला आदेश

नाशिकमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज सातवा दिवस, सोमवारी होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा

चंद्रपुरात घरगुती वादातून पत्नीसह दोन मुलींची कुऱ्हाडीनं वार करत हत्या. चंद्रपुरातील मौशी तालुक्यातील धक्कादायक घटना. 

संत गजानन महाराजांचा आज १४६ वा प्रकटदिन, यानिमित्त शेगावच्या गजानन महाराज मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन, शेकडो दिंड्या दाखल

आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर तर हार्बरवर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान मेगाब्लॉक.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram