ABP Majha Headlines : 11 PM : 12 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  11  PM : 12 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

महाराष्ट्र भाजपच्या मोठ्या चेहऱ्यांना लोकसभा लढवावी लागण्याची शक्यता, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांच्या नावाची चर्चा
लोकसभा लढवण्याची मुनगंटीवारांना भीती, स्वत:चं वजन वापरा आणि मला भीतीतून मुक्त करा,सुधीर मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती 
राज्यसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार, लवकरच केंद्रीय निवडणूक समिती घोषणा करणार
महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गटाला कमी जागा मिळण्याची शक्यता... ४०० पारचं ध्येय पूर्ण करण्यासाठी भाजप कोणताही प्रयोग करण्यास इच्छुक नाही, सूत्रांची माहिती
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ४३ उमेदवारांची घोषणा..कमलनाथ आणि अशोक गेहलोत यंदा लोकसभा निवडणुकीपासून दूर
विजय शिवतारेंनी बारामतीत आम्हाला डॅमेज केलं तर कल्याणचा निकाल वेगळा लागेल, अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपेंचा शिंदे गटाला थेट इशारा
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये, आदिवासी बांधवांच्या होळीत राहुल गांधी सहभागी, १७ मार्च रोजी मुंबईतल्या शिवाजी पार्कात यात्रेचा समारोप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram