ABP Majha Headlines : 11 PM: 10 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 11 PM: 10 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स ABP Majha
महायुतीत २५ जागांवर मैत्रिपूर्ण लढतीबाबत भाजपकडून चाचपणी, अमित शाहांच्या दौऱ्यात चर्चा झाल्याची माहिती...भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून चर्चेचं खंडन...
शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर भाजपची बॅनरबाजी...मोदी, शिंदे, फडणवीसांचे फोटो, अजितदादांचा फोटो मात्र गायब...आपणच फोटो लावू नका, असं सांगितलं, दादांचा दावा...
मला न विचारता निवडणूक आयोग संपर्क प्रमुख केलं हे मला मान्य नाही, समितीत काम करण्यास मी असमर्थ, किरीट सोमय्यांचं रावसाहेब दानवेंना पत्र
मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक भरती प्रक्रियेतून जाचक अट रद्द, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपा आयुक्तांना लिहिलं होतं पत्र
राज ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, मुंबईतील इतर मंडळांनाही राज ठाकरेंची भेट
अभिनेत्री कंगना रनौतनं वांद्रेमधील बंगला ३२ कोटींना विकला, २०२०मध्ये याच बंगल्यावर बीएमसीनं केली होती कारवाई