ABP Majha Headlines : 11 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

कुर्ल्यात अपघातग्रस्त बेस्ट बसच्या चालकाला केवळ तीन दिवसांंचं इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचं प्रशिक्षण, कंत्राटी भरती करताना निकष डावलले का असा प्रश्न उपस्थित...

बेस्टमध्ये कंत्राटी भरतीला भाजपचा विरोध होता, पण आदित्य ठाकरेंच्या दबावामुळे कंत्राट पद्धत...भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचा आरोप...दुर्घटनेतल्या मृतांची संख्या ७ वर...

कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरचा मुस्लिम पक्षाचा दावा कोर्टानं फेटाळला, ४८ वर्षांपासून सुरु असलेला वाद निकाली, हिंदू संघटनांकडून कोर्टाचं स्वागत..

ईव्हीएमच्या मुद्द्यावर दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक...अरविंद केजरीवाल, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह महाराष्ट्रातले पवारांच्या पक्षाचे नेते उपस्थित...

शासकीय रुग्णालयांना विशाल एंटरप्राईजेसकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा वापर थांबवण्याच्या सूचना.. अन्न आणि औषध प्रशासनाकडून सर्व औषधांची तपासणी करण्याचेही आदेश...माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट...

बांगलादेशातल्या हिंदू अत्याचारांविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा... मुंबईसह नागपूर, संभाजीनगर,नाशिक, रत्नागिरीसह अनेक शहरांत एल्गार...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram