ABP Majha Headlines : 12 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  12 PM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भावाने केलेल्या पोस्टमुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. संजय राऊत यांचे सख्खे भाऊ संदीप उर्फ अप्पा राऊत यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट केली. यानंतर काही वेळातच ती डिलीट केल्याचं दिसून आले. मात्र संदीप राऊत यांनी केलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान संदीप राऊत हे भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारीही आहेत.

संदीप राऊत यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?

संदीप उर्फ अप्पा राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट करत शिवसेना ठाकरे गटात एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्ती केली. नेत्यांपुढे पुढं-पुढं करणाऱ्यांनाच पक्षात पद मिळत असल्याचा केला आरोप संदीप राऊत यांनी आपल्या पोस्टद्वारे केला आहे. ही पोस्ट संदीप राऊत यांनी थोड्यावेळेनंतर डिलीट केली होती. त्यामुळे राऊतांच्या घरात नेमकं चाललंय काय?, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram